जीवनचरित्र

412351067_881131750679433_9196148508515343363_n

यशवंत माने

यशवंत माने, पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील शेळगाव या छोट्या गावातून जन्मलेले, एक महत्त्वाचा व्यक्ती आहे. आपल्या गावातील एक नम्र ठेकेदारपासून आता राज्यातील रेल्वे विभागातील प्रमुख ठेकेदारपर्यंत, यशवंत माने यांचा प्रवास अनेकांना प्रेरणा देतो.

राज्यातील अनेक महत्वाच्या नेत्याप्रमाणेच ग्रामपंचायत निवडणुकीपासून सुरुवात केली. ग्रामपंचायतीला निवडून आल्यानंतर त्यांनी आपल्या तेथील नेत्यांच्या सहकार्याने स्थापनेपासून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात असणाऱ्या इंदापूर बाजार समितीची सत्ता उलथवून टाकण्यात सिंहाचा चाटा उचलला. त्याचे बक्षीस म्हणून त्यांना इंदापूर बाजार समितीचे उपसभापती पद बहाल करण्यात आले. या निवडणुकीमुळे यशवंत माने यांनी पवार कुटुंबाचे लक्ष बेधून घेतले. त्याचाच एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यशवंत माने यांची पुणे जिल्हा राष्ट्रबादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड केली. या निवडीनंतर यशवंतरावांनी मागे वळून पाहिले नाही. राज्यातील रेल्वे विभागाशी संबंधतीत जे जे ठेकेदार आहेत त्यात यशवंत माने

राजकारणाच्या नादी लागले की व्यवसायाकडे दुर्लक्ष होते. आणि प्रगतिकडून अधोगतिकडे वाटचाल सुरू होते. हे राज्यातील अनेक राजकारण्याबाबत घडले आहे. यशवंत माने यांनी मात्र राजकारणाबरोबरच व्यवसायाकडेही लक्ष दिले. दोघांची सांगड घालून प्रगतीची पताका मोठ्या डौलाने फडकवत ठेवली. राज्यातील रेल्वे विभागाशी संबंधतीत जे जे ठेकेदार आहेत त्यात यशवंत माने यांचे नाव पहिल्या पाच जनात घेतले जाते. ठेकेदारी आणि राजकारण दोन्ही गोष्टी हातात हात घालून यशवंत माने यांना प्रगतीकडे घेऊन जात असताना त्यांचे कर्तृत्व अजितदादांच्या नजरेत भरले. गडी कामाचा दिसतोय हे अजितदादांनी हेरले. तत्पूर्वी आरक्षित असलेल्या मोहोळ विधानसभा मतदार संघात तत्कालीन आमदार रमेश कदमांना पर्याय शोधण्याचे काम सुरू होते. यशवंत माने, त्यांना सक्षम पर्याय ठरू शकतात याची खात्री झाल्यानंतर त्यांना मोहोळ मध्ये पाठविण्याचा निर्णय झाला.